जिजाऊ.कॉम हा एक, राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि कर्तुत्वाने प्रेरित होऊन, राष्ट्र निर्माणाचे कार्य करणाऱ्या आणि करू इच्छिनाऱ्या तरुणांसाठीचा एक मंच आहे. २००८ पासून, जिजाऊ.कॉम विविध माध्यमांतून आणि लोक सहभागातून महाराष्ट्रातील ग्रामीण समस्यांबद्दल विविध पातळीवर काम करत आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात जिजाऊ, शिवबा आणि संभाजींच्या प्रेरणेने अनेक उपक्रम तरुण (त्यात तरुणी ही आल्याच) राबवत आहेत. त्या तरुणांच्या विचारांना, कामांना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम जिजाऊ.कॉम करते. जिजाऊ.कॉमच्या या चळवळीला लोकांनी मागील काही वर्षात भरभरून प्रतिसाद दिला.

संक्रमण स्थितीतला महाराष्ट्र आणि भारत खंबीरपणे उभे राहावेत आणि इथला समाज स्वतःच्या खांद्यावर स्वतःच डोकं ठेऊन जगणारा असावा म्हणून, आपण सगळ्यांनी जमेल तिथे - जमेल तसं प्रयत्नरत राहायला हवं. राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया थांबणारी नसते. महाराजांनी आपल्याला लोककल्याणकारी स्वराज्य आऊ जिजाऊंच्या प्रेरणेने उभं करून दिलं. संभाजी महाराजांनी ते स्वराज्य कायम राहावं आणि वाढावं म्हणून स्वतःचे प्राणही दिले. त्याच लोककल्याणकारी उद्देशाला आणि त्यागाला समोर ठेऊन आपण इथला वंचित, गरीब आणि सामान्य माणूस चांगलं आयुष्य कसा जगू शकेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्या प्रयत्नात जिजाऊ.कॉमवर तुम्हाला तुमचे साथीदार मिळतील. हे उदेष्य ठेऊन येत्या काळात पुन्हा नव्याने हा मंच पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

हे करत असतांना आम्ही कार्यकर्त्यांनी एक विचार उराशी बाळगलाय. तोच तुम्हीही बाळगत असाल तर सोबत काम करूयात. "आम्हाला माहित नाही, आम्ही जग बदलू शकू की नाही, पण त्यासाठी एकदा प्रयत्न करायचा निश्चय आम्ही केलाय!"

आमचे उपक्रम

एका सशक्त राष्ट्र निर्माणासाठी तुमच्या सहकार्याने अशा प्रकारे योगदान दिले जाते

मोफत UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा

  • दहावीते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन IAS/NDA फाउंडेशन तयारी
  • पदवीच्याविद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन UPSC/MPSC इंटिग्रेटेड तयारी
  • विद्यार्थ्यांनाऍडमिशन मिळाल्यानंतर अधिकारी होईपर्यंत मार्गदर्शन
  • पुणे येथील एक्सलन्स आयएएस अकॅडमीच्या माध्यमातून
  • -

राष्ट्रमाता जिजाऊ शैक्षणिक योजना

250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या मदतीने प्रगतीसाठी प्रोत्साहन
  • शैक्षणिक साहित्य/गरजू विद्यार्थ्यांना विशेष मदत
  • अवांतर वाचनाची पुस्तके
  • वक्तृत्व/निबंध स्पर्धा
  • जिजाऊ.कॉम पुरस्कृत मुलांची आणि मुलींच्या कब्बडी टीम राज्य स्तरीय विजेत्या आहेत
  • -

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना हातभार

मराठवाड्यातील ५० कुटुंबांना मदत
  • प्रत्येक कुटुंबाला तातडीची १० हजारांची मदत
  • याच माध्यमातून शेतीचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न
  • या कुटुंबाना शासकीय यंत्रणेकडूनही मदतीसाठी प्रयत्न
  • मुलींची लग्न किंवा अत्यंत निकट असणाऱ्या कुटुंबांना विशेष मदत
  • -


 

तुमचा सहभाग

सोबत काम करूयात

राज्यभर विविध उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी येथे रजिस्टर करा. तुम्हीही काही उपक्रम राबवू इच्छित असाल तर त्या उपक्रमांनासुद्धा मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच नियमित जिजाऊ.कॉम च्या विविध उपक्रमांबद्दल आपल्याला मेल द्वारे कळवण्यात देखील येईल.

 
आपले नाव, गाव, जिल्हा, मोबाईल आणि ईमेल या लिंक वर भरा .
 

जिजाऊ.कॉम हि संस्था नाही किंवा कुठला ही विशेष गट नाही. ओळखी आणि अनोळखी लोकांनी राजमाता जिजाऊंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन सुरु केलेली चळवळ आहे. यात सामील व्हा, या चळवळीचे कार्यकर्ते व्हा. शेवटी आपल्या सगळ्यांचा उद्देश्य हा 'कुठेही करू, काहीही करू, पण चांगलंच करू हा आहे'. आमच्या संपर्कासाठी येथे ई-मेल करा:teamjijau@gmail.com.

फेसबुकवर जिजाऊ.कॉम च्या इतर कार्यकर्त्यांशी संपर्कात राहण्यासाठी लाईक आणि फॉलो करा.